राणी दुर्गावती : मुघलांसमोर न झुकणारी गोंडवाना साम्राज्याची महान योद्धा
राणी दुर्गावती आणि गोंडवाना साम्राज्याचा इतिहास पंधराव्या शतकात सम्राट अकबराच्या झेंड्याखाली मुघल साम्राज्य भारतभर आपली मुळे पसरवत होते. अनेक हिंदू राजांनी त्याच्यापुढे शरणागती पत्करली आणि अनेकांनी आपली राज्ये वाचवण्यासाठी शौर्याने लढा दिला. राजपुतानाच्या माध्यमातून अकबराची दृष्टी मध्य भारतातही पोहोचली. पण मुघलांना मध्य भारत आणि विशेषतः गोंडवाना जिंकणे अजिबात सोपे नव्हते. कोणतेही मोठे राज्य किंवा राजा ...